Sunday, July 15, 2007

कोणाची माती अन कोणाची माणसं


बोडके डोंगर खोलगट दरी
फ़िकी आस्मानं बेभान वारी

सुकती नदी मोकळी रानं
तहानली धरती तळपती उन्हं

न सुटणारे हे भुपूत्राचे प्रष्णं
ह्यांत बेरजेला लागली राजकारणं

पोत्यांत साठे फ़क्तं ती गरीबी
शहराचा रस्तांच राहतो मग नशीबी

मंत्री अन संत्री करती जाणून अजाणसं
उरे ती मग कोणाची माती अन कोणाची माणसं

-मनीष

Monday, July 9, 2007

असा मी कसा मी?


-असा मी कसा मी?-

कधी विचारी कधी अविचारी
कधी शेठ तर कधी भिकारी

कधी प्रवासी कधी मी भटका
कधी संग तर कधी एकटा

कधी मी उत्तर कधी मी शंका
कधी धागा तर कधी मी गुंता

कधी स्पर्श मी कधी मी गुद्दा
कधी फ़ुल तर काटा सुद्धा

कधी दैवी मी कधी राक्षसी
हा असाच हा जन्म मानवी

-मनीष

खेळ


आयुष्य आहे एक सुंदर खेळ
खेळायच्या आधिच मात्र संपू देऊ नका वेळ

इथे दु:खाचे राज्य चूकवून चालत नसते
लपायची वेळ आली की जागा सापडतच नसते

आपल्यावर राज्य आले की सुखाला शोधायचे
वेळ आली तर नशीबापाठी लपलेल्या दु:खालाच सुख म्हणायचे

लपाछपीच्या ह्या डावात cheating कारण चालत नाही
दु:खाला सुख म्हंटले तर परत राज्य आल्याशिवाय रहात नाही

राज्य आले तर घ्या हो खरी गंमत त्यातच आहे
अंधार व्हायच्या आत सुखाला जे शोधून काढायचे आहे

-मनीष

क्षण


This was inspired by one of my treks.

क्षण

तिच धरती, तेच क्षण, तिच हवा, तोच सुगंध
सगळ्या ह्या हव्याहव्याश्या गोष्टी ठेवावाश्या वाटतात करुन मनात बंद

अंगावर माती उडत होती
पक्ष्यांची किलबिल चालू होती
नागमोडी जाणारी छोटीशी पायवाट चालत रहा म्हणत होती

दूरवर सुर्य दिसत होता
पण त्याच्या तेजाला काजवाही लाजवत होता
दूरच्या गावांत मिणमिणणारा दिवा इथेच रहा म्हणत होता

रंगीत फ़ुले पानांत लपून चोरून मला बघत होती
चोहिकडची ती हिरवळ मन धुंद करत होती
मधेच येणारी वा-याची झुळूक पानांबरोबर खेळत होती

नकळत एकदम शांतता झाली तर
रातकिड्यांची किरकिर चालु होती
येणा-या अंधा-या रात्रीची जाणीव मात्र करुन देत होती

ढगांनी दाटी केली होती
संध्याकाळची ती वेळ होती
नदी मंद चालीने माझ्याबरोबर चालू पहात होती

गंध ओल्या मातीचा अंगावर शहारे आणत होता
झुळु झुळु वाहणारा वारा मझ्याशी बोलू पहात होता
निसर्गराजा खुद्द जणू आज मझ्यावार मेहेरबान झाला होता

- मनीष

भरकटलेलं


This poem was written sometime back...dont quiet remember

भरकटलेलं

एकच स्वप्न ते हि परकं
एकच ह्र्दय ते हि मोडकं
स्वतहाचे घर बांधावं म्हंटलं
तर एकच अंगण ते हि वाकडं

एकच सुख ते हि विरलं
एकच शरीर ते हि भिजलं
मिणमिणणा-या एका पणतीत
तेल होतं ते पण आज संपलं

एकच चित्र ते हि पुसलं
एकच मन ते हि रुसलं
जीवनाच्या ह्या वळणावर
आई तुझं हे पोर आज थकलं

-मनीष

रे पाखरा....



रे पाखरा...

अजुन एक पाखरु,
घरटं सोडून निघालं
आभाळाची उंची गठायला,
डोळे झाकुन पळालं

ध्यास घेतला त्याने आणि,
सगळं काही मागे टाकून उडालं
उमेदीचे पंखी बळ घेउन,
सातासमुद्रापार पोहोचलं

नवीन जगी नवीन ध्येय घेउन,
स्वताहाचं घरटं बनवू लागलं
सगळे कष्ट सगळे प्रष्ण विसरुन,
तिथेच रमु लागलं

एक मात्र घोडचूक,
स्वताहाच्या नकळतंच करु लागलं
जिथे उडायला शिकलं,
तेच घरटं त्याला आज छोटं वाटू लागलं

अरे पाखरा, विसर कष्ट विसर सारे प्रष्ण,
पण स्वताहाचे बळ विसरु नकोस
जिथे तुला हे बळ मिळालं,
ते घरटं विसरु नकोस...ते घरटं विसरु नकोस!

-मनीष

रूममेट


This is a poem, that I had written during my student days in Rolla. Going down that memory lane again....through this poem!

-रूममेट-

हाच विचार क्षणी क्षणी
तुझ्या मनी माझ्या मनी
कोणी घासायची भांडी आणि कचरा काढायचा कोणी॥ध्रु॥

कालचा दिवस असाच गेला
सगळ्यांनी हाच विचार केला
एक दिवस काम केले तर काय बरे फ़रक पडतो त्याला?

आजचा दिवसही आहे भरपूर काम
रिसर्च आणि असाईनमेन्ट मुळे अजीबात नाही आराम
काँप्यूटर समोर दिवसभर बसून डोके झालेय एकदम हैराण!

पलीकडेही तीच गत
डोक्याला सगळ्यांच्या एकच कटकट
रोजचा साधा स्वैपाक करायलाही वेळ मग नाही मिळत!

घरी आल्यावर भांडी दिसतात
हळूच डोळे टिव्ही कडे वळतात
हात आपोआप रिमोट कडे जाउन चॅनल चेन्ज करु लागतात ।

समोर असतो मित्र बसलेला
बराच वेळ चोरुन ठेवलेली नजर मग भिडते नजरेला
दोघांनाही कळून येते आणि मग हळूच स्माईल देतो एकदूसरयाला ।

हळूहळू दिवस सरतात
कॅलेंडर ची पाने संपुन जातात
पुढच्या पुर्ण आयुष्यात मात्र ह्याच आठवणी खुद्कन हसवून जातात!

-तुमचा प्रिय रूममेट मनीष

हसतेस सखी तू जेव्हा


आज जरा वेगळा विषय लिहावा असा विचार केला. बराच विचार केला म्हणले काय लिहावे शेवटी कविता छापून काढावी असा विचार केला. तर तुर्तास खाली माझी एक कवीता आहे ती लीहीतोय. Its my romantic take on a popular sad marathi song "Nastes ghari tu jenvha". Sorry being a little romantic here. This was written for someone special. So here it goes....

-हसतेस सखी तू जेव्हा-

हसतेस सखी तू जेव्हा, तुझे स्मित हास्य पाहतो
मन प्रफ़ुल्लित गं होते, जीव मौल्यवानसा होतो

चन्द्र बिचारा नभातून, कळी उमलण्या थांबतो
परी सुर्य सुदैवी असा मी, ही कळी उमलता पहातो

तुजं सांगतो सखे गं आज, जगतो कसा मी ऐसे
तुज साठी जीव सुटेना, तू हसण्या रोज तो अडकतो

जीवनात आली तू जेव्हा, तो क्षण असा वाटतो
जगण्याचे आजवर प्रयत्न, परी आज खरा मी जगतो

- मनीष