
रे पाखरा...
अजुन एक पाखरु,
घरटं सोडून निघालं
आभाळाची उंची गठायला,
डोळे झाकुन पळालं
ध्यास घेतला त्याने आणि,
सगळं काही मागे टाकून उडालं
उमेदीचे पंखी बळ घेउन,
सातासमुद्रापार पोहोचलं
नवीन जगी नवीन ध्येय घेउन,
स्वताहाचं घरटं बनवू लागलं
सगळे कष्ट सगळे प्रष्ण विसरुन,
तिथेच रमु लागलं
एक मात्र घोडचूक,
स्वताहाच्या नकळतंच करु लागलं
जिथे उडायला शिकलं,
तेच घरटं त्याला आज छोटं वाटू लागलं
अरे पाखरा, विसर कष्ट विसर सारे प्रष्ण,
पण स्वताहाचे बळ विसरु नकोस
जिथे तुला हे बळ मिळालं,
ते घरटं विसरु नकोस...ते घरटं विसरु नकोस!
-मनीष
No comments:
Post a Comment