Monday, July 9, 2007

क्षण


This was inspired by one of my treks.

क्षण

तिच धरती, तेच क्षण, तिच हवा, तोच सुगंध
सगळ्या ह्या हव्याहव्याश्या गोष्टी ठेवावाश्या वाटतात करुन मनात बंद

अंगावर माती उडत होती
पक्ष्यांची किलबिल चालू होती
नागमोडी जाणारी छोटीशी पायवाट चालत रहा म्हणत होती

दूरवर सुर्य दिसत होता
पण त्याच्या तेजाला काजवाही लाजवत होता
दूरच्या गावांत मिणमिणणारा दिवा इथेच रहा म्हणत होता

रंगीत फ़ुले पानांत लपून चोरून मला बघत होती
चोहिकडची ती हिरवळ मन धुंद करत होती
मधेच येणारी वा-याची झुळूक पानांबरोबर खेळत होती

नकळत एकदम शांतता झाली तर
रातकिड्यांची किरकिर चालु होती
येणा-या अंधा-या रात्रीची जाणीव मात्र करुन देत होती

ढगांनी दाटी केली होती
संध्याकाळची ती वेळ होती
नदी मंद चालीने माझ्याबरोबर चालू पहात होती

गंध ओल्या मातीचा अंगावर शहारे आणत होता
झुळु झुळु वाहणारा वारा मझ्याशी बोलू पहात होता
निसर्गराजा खुद्द जणू आज मझ्यावार मेहेरबान झाला होता

- मनीष

No comments: