Monday, July 9, 2007

रूममेट


This is a poem, that I had written during my student days in Rolla. Going down that memory lane again....through this poem!

-रूममेट-

हाच विचार क्षणी क्षणी
तुझ्या मनी माझ्या मनी
कोणी घासायची भांडी आणि कचरा काढायचा कोणी॥ध्रु॥

कालचा दिवस असाच गेला
सगळ्यांनी हाच विचार केला
एक दिवस काम केले तर काय बरे फ़रक पडतो त्याला?

आजचा दिवसही आहे भरपूर काम
रिसर्च आणि असाईनमेन्ट मुळे अजीबात नाही आराम
काँप्यूटर समोर दिवसभर बसून डोके झालेय एकदम हैराण!

पलीकडेही तीच गत
डोक्याला सगळ्यांच्या एकच कटकट
रोजचा साधा स्वैपाक करायलाही वेळ मग नाही मिळत!

घरी आल्यावर भांडी दिसतात
हळूच डोळे टिव्ही कडे वळतात
हात आपोआप रिमोट कडे जाउन चॅनल चेन्ज करु लागतात ।

समोर असतो मित्र बसलेला
बराच वेळ चोरुन ठेवलेली नजर मग भिडते नजरेला
दोघांनाही कळून येते आणि मग हळूच स्माईल देतो एकदूसरयाला ।

हळूहळू दिवस सरतात
कॅलेंडर ची पाने संपुन जातात
पुढच्या पुर्ण आयुष्यात मात्र ह्याच आठवणी खुद्कन हसवून जातात!

-तुमचा प्रिय रूममेट मनीष

No comments: