Friday, August 24, 2007

-मनोगत-

मनोगत......अगदी एखदया नाटकात असतं ना तसं. आता हे कोणाचं मनोगत आहे? नाटकातल्या एका पात्राचं एक असंच मनोगत.

आता हे पात्रं कुठल्या स्तरापर्यंत गोंधळलेलं आहे ते तुम्हीच पहा!....


Sunday, July 15, 2007

कोणाची माती अन कोणाची माणसं


बोडके डोंगर खोलगट दरी
फ़िकी आस्मानं बेभान वारी

सुकती नदी मोकळी रानं
तहानली धरती तळपती उन्हं

न सुटणारे हे भुपूत्राचे प्रष्णं
ह्यांत बेरजेला लागली राजकारणं

पोत्यांत साठे फ़क्तं ती गरीबी
शहराचा रस्तांच राहतो मग नशीबी

मंत्री अन संत्री करती जाणून अजाणसं
उरे ती मग कोणाची माती अन कोणाची माणसं

-मनीष

Monday, July 9, 2007

असा मी कसा मी?


-असा मी कसा मी?-

कधी विचारी कधी अविचारी
कधी शेठ तर कधी भिकारी

कधी प्रवासी कधी मी भटका
कधी संग तर कधी एकटा

कधी मी उत्तर कधी मी शंका
कधी धागा तर कधी मी गुंता

कधी स्पर्श मी कधी मी गुद्दा
कधी फ़ुल तर काटा सुद्धा

कधी दैवी मी कधी राक्षसी
हा असाच हा जन्म मानवी

-मनीष

खेळ


आयुष्य आहे एक सुंदर खेळ
खेळायच्या आधिच मात्र संपू देऊ नका वेळ

इथे दु:खाचे राज्य चूकवून चालत नसते
लपायची वेळ आली की जागा सापडतच नसते

आपल्यावर राज्य आले की सुखाला शोधायचे
वेळ आली तर नशीबापाठी लपलेल्या दु:खालाच सुख म्हणायचे

लपाछपीच्या ह्या डावात cheating कारण चालत नाही
दु:खाला सुख म्हंटले तर परत राज्य आल्याशिवाय रहात नाही

राज्य आले तर घ्या हो खरी गंमत त्यातच आहे
अंधार व्हायच्या आत सुखाला जे शोधून काढायचे आहे

-मनीष

क्षण


This was inspired by one of my treks.

क्षण

तिच धरती, तेच क्षण, तिच हवा, तोच सुगंध
सगळ्या ह्या हव्याहव्याश्या गोष्टी ठेवावाश्या वाटतात करुन मनात बंद

अंगावर माती उडत होती
पक्ष्यांची किलबिल चालू होती
नागमोडी जाणारी छोटीशी पायवाट चालत रहा म्हणत होती

दूरवर सुर्य दिसत होता
पण त्याच्या तेजाला काजवाही लाजवत होता
दूरच्या गावांत मिणमिणणारा दिवा इथेच रहा म्हणत होता

रंगीत फ़ुले पानांत लपून चोरून मला बघत होती
चोहिकडची ती हिरवळ मन धुंद करत होती
मधेच येणारी वा-याची झुळूक पानांबरोबर खेळत होती

नकळत एकदम शांतता झाली तर
रातकिड्यांची किरकिर चालु होती
येणा-या अंधा-या रात्रीची जाणीव मात्र करुन देत होती

ढगांनी दाटी केली होती
संध्याकाळची ती वेळ होती
नदी मंद चालीने माझ्याबरोबर चालू पहात होती

गंध ओल्या मातीचा अंगावर शहारे आणत होता
झुळु झुळु वाहणारा वारा मझ्याशी बोलू पहात होता
निसर्गराजा खुद्द जणू आज मझ्यावार मेहेरबान झाला होता

- मनीष

भरकटलेलं


This poem was written sometime back...dont quiet remember

भरकटलेलं

एकच स्वप्न ते हि परकं
एकच ह्र्दय ते हि मोडकं
स्वतहाचे घर बांधावं म्हंटलं
तर एकच अंगण ते हि वाकडं

एकच सुख ते हि विरलं
एकच शरीर ते हि भिजलं
मिणमिणणा-या एका पणतीत
तेल होतं ते पण आज संपलं

एकच चित्र ते हि पुसलं
एकच मन ते हि रुसलं
जीवनाच्या ह्या वळणावर
आई तुझं हे पोर आज थकलं

-मनीष

रे पाखरा....



रे पाखरा...

अजुन एक पाखरु,
घरटं सोडून निघालं
आभाळाची उंची गठायला,
डोळे झाकुन पळालं

ध्यास घेतला त्याने आणि,
सगळं काही मागे टाकून उडालं
उमेदीचे पंखी बळ घेउन,
सातासमुद्रापार पोहोचलं

नवीन जगी नवीन ध्येय घेउन,
स्वताहाचं घरटं बनवू लागलं
सगळे कष्ट सगळे प्रष्ण विसरुन,
तिथेच रमु लागलं

एक मात्र घोडचूक,
स्वताहाच्या नकळतंच करु लागलं
जिथे उडायला शिकलं,
तेच घरटं त्याला आज छोटं वाटू लागलं

अरे पाखरा, विसर कष्ट विसर सारे प्रष्ण,
पण स्वताहाचे बळ विसरु नकोस
जिथे तुला हे बळ मिळालं,
ते घरटं विसरु नकोस...ते घरटं विसरु नकोस!

-मनीष