Sunday, January 6, 2008

हरवणारे क्षण

कधीतरी असे क्षण येतांत कि जे तुम्हांला हळवे बनवून जातांत. मग तुम्हांला त्या वेळेस कवितेतले भावार्थ समजू लागतांत. निसर्गातले सौंदर्य दिसू लागते. एखाद्या सुंदर नक्षीकामाची बारीकता लक्षांत येऊ लागते. नेहमीचेच ते जग पण त्याची विशालता तुम्हाला भारावून जाते. तुमचे मन जसे एका सुंदर गाण्याच्या सुंदर चालीवर मंत्रमुग्ध होऊन तुमच्या नकळंतंच नाचू लागते. असे क्षण फ़ार मोजके असतांत पण हेच क्षण तुमचं जगंणं सार्थक करतांत.

ह्यांच अर्थी इंग्रजी भाषेत एक म्हण आहे. “Life is not measured by the number of breaths we take, but by the moments that take our breath away”.

तंतोतंत पटण्यासारखी आहे हि म्हण. फ़क्तं कवी मनांनेच ह्या गोष्टींचा, ह्या क्षणांचा आस्वाद घेता येतो कां? अजिबात नाही. असे क्षण सगळ्यांच्याच आयुष्यांत येतांत, मनाच्या कोनाड्यांत मग ते स्वत:ची अशी एक जागा बनवून बसतांत. तुम्ही त्या क्षणांत स्वत:ला हरवतां, पण ते क्षण मात्रं कधी तुमच्याकडून हरवंत नाहीत.

-मनीष

Monday, November 19, 2007

Wednesday, September 19, 2007

"मी माझं मलांच हे मीपण"
"लहान मुलांचा खुप हेवा वाटतो मला. किती सुखी आयुष्य असतं. फ़क्तं स्वत:पुरता विचार करतो आपण लहानपणी. बाकी कसलं टेन्शन नसतं." अशी अनेक वाक्यं आपल्या कानांवर अगणित वेळा पड्ली असतील तर त्यांत फ़ारसं काही नवंल नाही. मात्रं असे हे बोलणारी तुमच्या आमच्यासारखी लोकं हे जाणतांत का कि मोठे झाल्यांवरही आपल्यांत फ़ारसा काही फ़रंक पडंत नाही? मी म्हणतो फ़रक पडू पण नये आपल्या स्वार्थीपणामधे. फ़रंक पडावा तो फ़क्तं आपल्या मीपणांमधे.

आपण जसे मोठे होतो त्याप्रमाणे बदल होतो तो मीपणाच्या अर्थाचा. तेंव्हा मी फ़क्तं ’मी स्वत:’ एवढा त्याचा अर्थ राहत नाही. त्यांत बेरीजंच होत राहते. क्वचीत मौक्यांमधे कदाचीत वजाबाकी पण होते. पण स्वार्थीपण मात्रं आपलंच असतं. घट्टं चिकटून राहतं आपल्याला ते, जसा गुळाच्या ढेपेला चिकटलेला मुंगळा. मग त्याला ठेचलं तरी तो गुळ काही सोडंत नाही.

प्रत्येक माणसाला तोलण्यांचा एक सगळ्यांत सोपा उपाय आहे हा. प्रत्येकाची मीपणाची व्याख्या त्या माणसाचे वय सांगून जाते. शेवटी राहतं फ़क्तं "मी माझं मलांच हे मीपण".

-मनीष

Monday, September 3, 2007

एकांकिका


एकांकिका

पद भ्रमती एकटा तो पथ
तोची जो मज आजवर माहीत
कुठे नेई तो मजला ना ठाव
केवळ ती मम छाया मजसोबंत

कोणी ना दिसे ऐसा हा प्रहर
शोधे हि नजर कोणांस ना खबर
भेटेल कोणी ऐसा उगाच तो समज
तोवर एकटा तो रस्ता व एकटी ती नजर

-मनीष

Friday, August 24, 2007

-मनोगत-

मनोगत......अगदी एखदया नाटकात असतं ना तसं. आता हे कोणाचं मनोगत आहे? नाटकातल्या एका पात्राचं एक असंच मनोगत.

आता हे पात्रं कुठल्या स्तरापर्यंत गोंधळलेलं आहे ते तुम्हीच पहा!....


Sunday, July 15, 2007

कोणाची माती अन कोणाची माणसं


बोडके डोंगर खोलगट दरी
फ़िकी आस्मानं बेभान वारी

सुकती नदी मोकळी रानं
तहानली धरती तळपती उन्हं

न सुटणारे हे भुपूत्राचे प्रष्णं
ह्यांत बेरजेला लागली राजकारणं

पोत्यांत साठे फ़क्तं ती गरीबी
शहराचा रस्तांच राहतो मग नशीबी

मंत्री अन संत्री करती जाणून अजाणसं
उरे ती मग कोणाची माती अन कोणाची माणसं

-मनीष