
"लहान मुलांचा खुप हेवा वाटतो मला. किती सुखी आयुष्य असतं. फ़क्तं स्वत:पुरता विचार करतो आपण लहानपणी. बाकी कसलं टेन्शन नसतं." अशी अनेक वाक्यं आपल्या कानांवर अगणित वेळा पड्ली असतील तर त्यांत फ़ारसं काही नवंल नाही. मात्रं असे हे बोलणारी तुमच्या आमच्यासारखी लोकं हे जाणतांत का कि मोठे झाल्यांवरही आपल्यांत फ़ारसा काही फ़रंक पडंत नाही? मी म्हणतो फ़रक पडू पण नये आपल्या स्वार्थीपणामधे. फ़रंक पडावा तो फ़क्तं आपल्या मीपणांमधे.
आपण जसे मोठे होतो त्याप्रमाणे बदल होतो तो मीपणाच्या अर्थाचा. तेंव्हा मी फ़क्तं ’मी स्वत:’ एवढा त्याचा अर्थ राहत नाही. त्यांत बेरीजंच होत राहते. क्वचीत मौक्यांमधे कदाचीत वजाबाकी पण होते. पण स्वार्थीपण मात्रं आपलंच असतं. घट्टं चिकटून राहतं आपल्याला ते, जसा गुळाच्या ढेपेला चिकटलेला मुंगळा. मग त्याला ठेचलं तरी तो गुळ काही सोडंत नाही.
प्रत्येक माणसाला तोलण्यांचा एक सगळ्यांत सोपा उपाय आहे हा. प्रत्येकाची मीपणाची व्याख्या त्या माणसाचे वय सांगून जाते. शेवटी राहतं फ़क्तं "मी माझं मलांच हे मीपण".
-मनीष