Sunday, January 6, 2008

हरवणारे क्षण

कधीतरी असे क्षण येतांत कि जे तुम्हांला हळवे बनवून जातांत. मग तुम्हांला त्या वेळेस कवितेतले भावार्थ समजू लागतांत. निसर्गातले सौंदर्य दिसू लागते. एखाद्या सुंदर नक्षीकामाची बारीकता लक्षांत येऊ लागते. नेहमीचेच ते जग पण त्याची विशालता तुम्हाला भारावून जाते. तुमचे मन जसे एका सुंदर गाण्याच्या सुंदर चालीवर मंत्रमुग्ध होऊन तुमच्या नकळंतंच नाचू लागते. असे क्षण फ़ार मोजके असतांत पण हेच क्षण तुमचं जगंणं सार्थक करतांत.

ह्यांच अर्थी इंग्रजी भाषेत एक म्हण आहे. “Life is not measured by the number of breaths we take, but by the moments that take our breath away”.

तंतोतंत पटण्यासारखी आहे हि म्हण. फ़क्तं कवी मनांनेच ह्या गोष्टींचा, ह्या क्षणांचा आस्वाद घेता येतो कां? अजिबात नाही. असे क्षण सगळ्यांच्याच आयुष्यांत येतांत, मनाच्या कोनाड्यांत मग ते स्वत:ची अशी एक जागा बनवून बसतांत. तुम्ही त्या क्षणांत स्वत:ला हरवतां, पण ते क्षण मात्रं कधी तुमच्याकडून हरवंत नाहीत.

-मनीष